विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील रिलेशनबाबत खूप चर्चा झाली आहे. कारण या दोघांना अनेकवेळेस एकत्र बघितले गेले आहे. हे दोघे एकमेकांच्या घरीही जात येत असतात. मात्र या दोघांनीही आपल्या रिलेशनद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
त्यांनी अफवांचे खंडण देखील केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपबाबत एक प्रकारची संदिग्धता निर्माण झाली आहे. आता या नात्यामधील संदिग्धता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वतः कतरिना कैफनेच हे रहस्य उघड करायचे असे ठरवले आहे. आत्तापर्यंत हे दोघेही आपल्या नात्यावर प्रतिक्रिया देणे टाळायचे आणि एकमेकांचे केवळ मित्र असल्याते सांगायचे. पण आता हे दोघेही सर्वांसमोर आपले नाते स्वीकारणार असल्याचे समजते आहे.
हे कपल सोशल मीडियावर आपल्या नात्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे समजते आहे. मात्र विकीच्या वडिलांचा त्याला विरोध आहे.
त्यांनी विकीला तसे न करण्याबद्दल तंबीही दिली आहे. विकीने आपल्या सहकलाकारांबरोबर इंटिमेट सीन करू नये अशी कतरिनाची अपेक्षा आहे. प्रोफेशल फ्रंटवर या दोघांचा “सूर्यवंशी’लवकरच रिलीज होणार आहे. दोघांकडे स्वतःचेही काही सिनेमे आहेत.