कतरिनाने दिली गुडन्यूज! विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Actress Katrina Kaif : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या. कतरिना आणि विकी कौशलने २३ सप्टेंबरला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. अखेर कतरिनाने एका गोंडस बाळाला आज ७ नोव्हेंंबर रोजी जन्म दिला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कतरिना आणि विकी दोघांचाही आनंद गगणात मावेनसा झाला आहे.
दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आशीर्वाद आणि ॐ असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
विकी आणि कतरिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आमच्या आनंदाची छोटी भेट आम्हाला मिळाली आहे. आभार व्यक्त करत आम्ही आमच्या छोट्या बाळाचं स्वागत करत आहोत. 7 नोव्हेंबर 2025 कतरिना आणि विकी. असे म्हटले आहे.
View this post on Instagram
अनेक वर्षक एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांची जोडी बॅालिवूडमधील आवडत्या जोडींपैकी एक मानली जाते. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा राजस्थानमध्ये शाही थाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याची बरीच चर्चा त्यावेळी झाली होती.
राजस्थानमधील सिक्स सेंसेस फोर्ट बरवाडा येथे पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्यात अनेक बॅालिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विवाह सोहळ्यात जवळचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी झाले होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची पहिली भेट 2019 मध्ये एका स्क्रीन अवॉर्ड्समध्ये झाली. त्यानंतर करण जौहरच्या एका पार्टीत पुन्हा एकदा दोघांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली हीच मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलली.
हेही वाचा : शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स ५७४ अंकांनी घसरला ; निफ्टीचीही लाल रंगात ओपनिंग





