मांडवगण फराटा : शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते शिरूरच्या पूर्व भागात अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मांडवगण फराटा गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असून, त्यासाठी नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम, जुन्या वर्ग खोल्या दुरुस्ती व भौतिक कामांसाठी ७२ लाख रुपये निधी मंजूर केला. याशिवाय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड मळा, जगताप वस्ती, चकोर वस्ती येथे नवीन वर्ग खोल्या, ग्रामा २४६ रस्ता, नमामि चंद्रभागा प्रकल्प निधी, रस्ता काँक्रिटीकरण, दफनभूमी, शेख वस्ती स्ट्रीट लाईट तसेच बाभुळसर बुद्रुक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लोकनेते दादा पाटील फराटे, सरपंच समीक्षा फराटे, सरपंच दिपाली नागवडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती दादासाहेब कोळपे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे मा व्हा चेअरमन बाबासाहेब फराटे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, विराज शेलार, सुभाष फराटे,राजीव फराटे, राजेंद्र दरेकर, अमोल शितोळे, अंकुश नागवडे, अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब पवार विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी, महेंद्र नागवडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक, माजी सरपंच गणेश मचाले, उपसरपंच सुनील देशवंत, सदस्य मनीषा नागवडे, अक्षय फराटे पाटील, सरपंच मांडवगण फराटा, तात्या शेलार कामगार नेते, संतोष नागवडे, चेअरमन बाभुळसर सोसायटी, ऋषी निंबाळकर, उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक, ऋषी खोरे, रामराव पाटील नागवडे, सोमनाथ नागवडे, ज्ञानदेव शितोळे, रामदास नागवडे आदी उपस्थित होते. महायुती सरकारने अनेक लोकप्रिय योजना अंमलात आणल्या असून अजूनही वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोचणार आहेत. मांडवगण फराटा हे गाव पंचांक्रोशीतील इतर गावांना जोडणारे मुख्य गाव असून ते एक मॉडेल म्हणून लवकरच तयार होईल. आतापर्यंत या भागात ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच भागात आवश्यक तेथे तातडीने निधी उपलब्ध केला जाईल. – ज्ञानेश्वर कटके, आमदार