राहुल गांधींच्या सभेला कमी गर्दी पाहून कस्तुरचंद पार्क लाजला असेल -भाजप

नागपूर: राहुल गांधी यांची नागपुरात सभा ज्या कस्तुरचंद पार्कवर स्व. अटलजी आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी गतकाळात आणि अलीकडे नरेंद्र मोदी यांनी गर्दीचे सर्व विक्रम मोडले, तो कस्तुरचंद पार्क सुद्धा २०% पेक्षा कमी भरलेला पाहून आज लाजला असेल!, अशी टीका भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केली आहे.

मैदान तर २०% पेक्षा कमीच भरले होते आणि जो काय २०% भाग व्यापला त्यातही अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. महाराष्ट्र आणि विदर्भातील जनतेने राहुल गांधी यांना नागपुरात बोलावून हा कौल दिला, असेही भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नागपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा किमान वेतन योजनेच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला १५ लाख रुपये देण्याचं फसवं आवाहन दिलं होतं मात्र आम्ही दिलेलं किमान वेतन योजनेचं आवाहन आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू. मी माझं ध्येय निश्चित केलं असून देशातील सर्वाधिक गरीब २०% जनतेला महिना ६ हजार म्हणजेच वार्षिक ७२ हजार देणं हेच माझं ध्येय आहे. या हिशोबाने मी देशातील सर्वाधिक गरिबांना किमान वेतन योजनेद्वारे ५ वर्षात ३ लाख ६० हजार रुपये देणार आहे.”

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज सकाळीच केरळ येथील वायनाड येथून लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला असून यानंतर त्यांनी तेथे रोड-शो द्वारे शक्तिप्रदर्शन देखील केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.