न्यूयॉर्क : अमेरिकेची तपास संस्था असलेल्या एफबीआयच्या प्रमुखपदी ट्रम्प प्रशासनाने नामनिर्देशित केलेले काश पटेलयांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजूरी दिली आहे. एफबीआयच्या प्रमुख पदावर नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. एफबीआयच्या फेररचनेला आपण महत्व देणार असल्याचे काश पटेल यांनी म्हटले आहे. काश पटेल यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सिनेटमध्ये झालेल्या मतदानामध्ये पटेल यांच्या बाजूने ५१ तर विरोधात ४९ मते पडली. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मर्कोवस्की या दोन सदस्यांनी काश पटेल यांच्या विरोधात मतदान केले. काश पटेल यांच्या नियुक्तीला डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांकडून कडाडून विरोध झाला होता. पटेल यांच्याकडून एफबीआयच्या प्रमुख पदाचा वापर ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांविरोधात सूड घेण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांकडून केला जात होता. पटेल यांनी आपल्या डीप स्टेटच्या शत्रूंची यादी आपल्याकडे तयार असल्याचा दावा पटेल यांनी फेटाळून लावला. ट्रम्प यांच्याविरोधात तपास करणाऱ्या एफबीआयच्या अधिकाऱ्यांना ते पूर्वी गुन्हेगारी गँगचे सदस्य म्हणून संबोधले होते. आपल्या या वक्तव्यापासून त्यांनी पहिल्यापासून फारकत घेतल्याचे धोरण ठेवले आहे. जी गँगपासून दूर राहून ९-११ च्या पार्श्वभुमीवर एफबीआयने देशाच्या संरक्षणाला महत्व देण्याचा वारसा एफबीआयने जपला आहे. पारदर्शक, उत्तरदायित्व आणि न्यायाप्रती कटिबद्ध एफबीआयची अमेरिकेला गरज आहे. हा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी चांगले सुरक्षा दल जपणे ही आपली कटिबद्धता असल्याचे पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.