Kasba Ganpati: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन; साडेसहा तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप
Kasba Ganpati:
Updated On:

Kasba Ganpati: पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे पतंगा घाटावर विधिवत विसर्जन करण्यात आले. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल साडेसहा तासांनंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी पतंगा घाटावर पोहोचली.
मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुणे दुमदुमून गेले होते. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पतंगा घाटावर पोहोचल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
कसबा गणपतीच्या विसर्जनानंतर पुण्यातील मानाच्या इतर गणपतींच्या मिरवणुकाही पुढे सरकत असून, शहरात गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याला वेग आला आहे..
टॅग्स:





