सारा नाही तर ‘हि’ अभिनेत्री आहे कार्तिकचा क्रश….!

कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी आहे ज्यांच्या फिमेल फॅन फॉलोइंगची संख्या सर्वाधिक आहे. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखल्या जाणारा कार्तिक अनेक मुलींची क्रश आहे. एवढंच नाही तर पतौडी प्रिन्सेस सारा अली खानलाही कार्तिक आवडतो. सारा अली खानने गेल्याच वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. “केदारनाथ’ हा सुशांत सिंह राजपूतबरोबर तिचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्यानंतर रणवीर सिंह बरोबर “सिंबा’ मधील तिच्या रोललाही चांगली दाद मिळाली. त्यामुळे कार्तिक प्रमाणेच सारा सुद्धा अनेक मुलांची क्रश आहे. मात्र  तिने अनेकदा जाहीरपणे ही गोष्ट मान्य केली कि कार्तिक तिचा क्रश आहे.

 

View this post on Instagram

 

You can just smile it away ❤️🎭🎶

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

मात्र ‘स्टूडंट ऑफ द इयर 2’मधून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेचं नावही कार्तिकसोबत जोडलं जात आहे. कार्तिक आर्यननं काही दिवसांपूर्वीच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नेहानं कर्तिकला अनन्या पांडे आणि सारा अली खानपैकी एकीची निवड करण्यासाठी सांगितलं होतं यावर उत्तर देताना कार्तिकनं अनन्या पांडेचं नाव घेतलं.

 

View this post on Instagram

 

All smiles 😁 – can’t wait to see all of you in Ahmedabad today 💓

A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

कार्तिक म्हणाला, ‘सध्या तरी मी अनन्याला जास्त चांगलं ओळखतो आणि तिच्यासोबत कामही करत आहे.’ शो दरम्यान कार्तिकला अनन्याची कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही असं विचारण्यात आलं त्यावर, ‘ती प्रत्येक गोष्टीवर प्रेम करते आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक करते.’ असं उत्तर कार्तिकनं दिलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here