कार्तिकला राग अनावर! स्टेजवरच तरुणाला गिटारने बडवले; व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचे सत्य आले समोर

Karthik Aryan Aashiqui 3 | अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आशिकी ३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. या दोघांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
अशातच आता चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक व्हि़डिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कार्तिक गिटारने एका तरुणाला मारताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे कार्तिकला राग अनावर झाला म्हणून त्याने तरुणाला गिटारने मारल्याची चर्चा केली जात होत. पण अखेर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचे सत्य समाेर आले असून हा आशिकी ३ च्या सेटवरील व्हिडिओ आहे.
या चित्रपटात कार्तिक रॅाकस्टारच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आशिकी ३ चे शुटिंग सिक्कीममधील गंगटोक येथे सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तेथील आहे. या व्हायरल व्डिडिओत कार्तिक एका गाण सादर करताना अचानक रागावतो आणि स्टेजवर उभ्या असलेल्या तरुणावर हातातील गिटार मारतो. यावेळी स्टेजवर अभिनेत्री श्रीलिला देखील दिसत आहे. वाढलेली दाढी आणि केस हा कार्तिकचा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
आशिकी ३ चे दिग्दर्शन अनुराग बासू करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्या ठिकाणी असलेली लोकं चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी आलेले आहेत. यामुळे तिथे मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. या चित्रपटामुळे कार्तिक आणि श्रीलिला हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ११९० मध्ये आशिकी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशा: वेड लावले होते. त्यानंतर २०१३ मध्ये आशिकी २ रिलीज झाला होता. या चित्रपटात आदित्य रॅाय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील गाणी अत्यंत लोकप्रिय झाली होती. आता आशिकी ३ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.





