तालुक्याची संख्या 528 सासवड- पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 31) पुरंदर तालुक्यातील तीन गावांतील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 528 झाली आहे, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुरंदर प्रशासनाकडून देण्यात आली. सासवड शहरात 251 करोना बाधित होते. त्यापैकी 10 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 197 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. सध्या 44 रुग्णांवर विविध उपचार केंद्रावर उपचार सुरू आहेत. पुरंदर तालुक्यातील 3 व्यक्तींचे खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बेलसर येथील 1, कुंभारवळण 1, तर नीरा येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. नीरा, बेलसर, कुंभारवळण येथील रुग्णांनी खासगी लॅबमध्ये करोना तपासणी केली होती. यामध्ये तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यातील संख्या 528 झाली आहे. 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 364 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर 141 पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात व करोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुरंदरच्या प्रशासनाकडून देण्यात आली.