देश कुठं निघाला? बुरखाधारी मुलीसमोर भगवाधारी युवकांच्या धार्मिक घोषणा

Updated On:

बंगळुरू – भारतीय संस्कृती आणि येथील एकात्मतेचे धडे शालेय जीवनात देण्यात येतात. परदेशातही भारतीय संस्कृतीचा आदराने उल्लेख केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे तरुणाईच्या धर्मिक उन्मादाचं विष कोण पेरतयं असा प्रश्न निर्माण होतोय. याचाचं सारिपाठ आज कर्नाटकमध्ये पाहायला मिळाला. यामुळे कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाला असून तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्नाटकमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर धार्मिक घोषणा देण्याचं लाजिरवान कृत्य भगवा गमछा गळ्यात परिधान केलेल्या युवकांच्या टोळक्याने केलं. त्याला प्रत्युत्तर देत युवतीने देखील “अल्लाहू अकबर”च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळं देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मांडा प्री युनिवर्सिटी कॉलेजमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर भगवा गमछा परिधान केलेल्या महाविद्यालयीन युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत गैरवर्तन केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा गमछा वाद पेटला असून धार्मिक तणाव निर्माण झाला आहे.

व्हिडीओमध्ये, एक कॉलेज तरुणी तिची स्कूटर पार्क करून कॉलेजच्या इमारतीच्या दिशेने जात असताना भगवा गमछा परिधान केलेल्या मुलांचा एक गट “जय श्री राम” असा जयघोष करत बुरखा घातलेल्या मुलीकडे जातो. मुस्लिम तरुणीनेही प्रत्युत्तरात ‘अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या.

यानंतर मुलगी ओरडत वर्गाकडे पळत गेली. त्यावेळी मुलांचा एक गट तिच्या मागे दिसला. दरम्यान, कॉलेजचे कर्मचारी त्या मुलांना थांबवून मुलीला सोबत घेऊन जाताना दिसत आहेत.

महाविद्यालयीन तरुणांमध्ये धार्मिक कट्टरतावाद किती खोलवर रुजतोय, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. अशा प्रकारचा कट्टरतावाद सहाजिकच कोणत्याही देशाला परवडणारा नसून सरकारने यावर वेळीच आवर घालायला हवी, अशी मागणी अनेक लोक सोशल मीडियावर करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

D. K. Shivakumar : कर्नाटक सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिवकुमार यांचे जनतेला आश्वासन

2026-09-20 22:35:32

D. K. Shivakumar : कर्नाटक सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिवकुमार यांचे जनतेला आश्वासन

D. K. Shivakumar : कर्नाटकात वंदे मातरमची दोनच कडवी गाणार; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मोठा निर्णय

2026-08-27 15:52:36

D. K. Shivakumar : कर्नाटकात वंदे मातरमची दोनच कडवी गाणार; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मोठा निर्णय

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

2026-08-22 19:26:59

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

Accident News : काळाचा घाला! तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात

2026-07-09 16:23:44

Accident News : काळाचा घाला! तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात

Congress Rajya Sabha candidate List : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! पहा कोणाकोणाला मिळाली संधी?

2026-06-05 09:59:27

Congress Rajya Sabha candidate List : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर! पहा कोणाकोणाला मिळाली संधी?