Congress News : राज्यातील राजकारण आधीच अस्थिर असताना काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते योगेशगौडा गौडा यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे धारवाड मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. (Congress News) नेमकं प्रकरण काय? १५ जून २०१६ रोजी धारवाडमधील जिममध्ये योगेशगौडा गौडा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर CBI कडे सोपवण्यात आला. (Congress News) CBI च्या तपासात विनय कुलकर्णी यांच्यावर या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. राजकीय वादातून भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने हत्या घडवून आणल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते. (Congress News) न्यायालयाचा मोठा निर्णय बंगळुरु येथील विशेष न्यायालयाने विनय कुलकर्णी यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. काही काळ जामिनावर असल्यानंतर साक्षीदारांवर दबाव टाकल्याच्या आरोपामुळे त्यांचा जामीनही रद्द करण्यात आला होता. (Congress News) सदस्यत्व का रद्द झाले? लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ नुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. त्यानुसार कर्नाटक विधानसभेने अधिकृत अधिसूचना काढत कुलकर्णी यांची आमदारकी रद्द केली. यामुळे आता धारवाड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला असून येथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. (Congress News)