Karnataka Chief Minister। मागील काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून नाराजीनाट्य सुरु आहे. या नाट्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार यादव यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेला वाद आता आणखी तीव्र होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ते त्यांच्या पदावर कायम राहणार असून पुढील वर्षी त्यांचा विक्रमी १७ वा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं म्हटलंय. अर्थखातेही सांभाळणाऱ्या सिद्धरामय्या यांनी या वर्षी मार्चमध्ये त्यांचा १६ वा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी सुरु असणारा हा वाद कायम आणखी चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत. याविषयी बोलताना सिद्धरामय्या यांनी, “मी जेव्हा पहिल्यांदा अर्थमंत्री झालो तेव्हा एका वृत्तपत्राने लिहिले होते की, ‘हे सिद्धरामय्या (कुरुबा) शंभर मेंढ्याही मोजू शकत नाहीत, ते कर्नाटकचे अर्थमंत्री कसे होतील?’ मी ते आव्हान म्हणून घेतले… आणि आज मी १६ अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढे, मी १७ वे अर्थसंकल्प सादर करेन.”असे म्हणत मुख्यमंत्रीपदावर ते कायम राहणार असल्याचे संकेत दिले. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू Karnataka Chief Minister। त्यांच्या विधानाने कार्यक्रमात जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. २०२६-२७ चा अर्थसंकल्प पुढील वर्षी मार्चमध्ये सादर होण्याची अपेक्षा असून त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. सिद्धरामय्या यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा जोरात सुरू आहे, कारण काँग्रेस सरकार नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ अर्ध्यावर पोहोचणार आहे. मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा का सुरू आहे? Karnataka Chief Minister। मे २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा झाली. अखेर काँग्रेसने शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी केले. दोन्ही नेत्यांमध्ये ‘रोटेशनल मुख्यमंत्री फॉर्म्युला’ वर सहमती झाल्याचे वृत्तही समोर आले, ज्याअंतर्गत शिवकुमार यांना अडीच वर्षांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करता येईल. तथापि, काँग्रेस पक्षाने कधीही या कराराची अधिकृतपणे पुष्टी केली नाही.