BJP leader MB Bhanuprakash died | कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शनिवारी इंधन दरवाढ केल्याने भाजपकडून या निर्णयाचा विरोध करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन केली जात आहे. यातच सोमवारी पेट्रोल-डिझेल दरातील वाढीविरोधात पक्षाच्या वतीने आयोजित एका आंदोलनादरम्यान एक दुख:द घटना घडली. आंदोलनादरम्यान एका जेष्ठ भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. शिमोगा जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सदस्य एमबी भानुप्रकाश आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे ते नेतृत्व करत होते. यादरम्यान त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. आंदोलनात सामील झाल्यानंतर एमबी भानुप्रकाश गाडीत बसताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने शहरातील नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भानुप्रसाद यांची राजकिय कारकीर्द भानुप्रसाद यांनी पक्षाच्या वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. ते माजी विधानपरिषद सदस्य होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. भानुप्रकाश यांनी 1999 मध्ये गजनूर जिल्हा पंचायत मतदारसंघातून राजकारणात प्रवेश केला. नंतर 2013 मध्ये त्यांनी भाजपचे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची पक्षाने भाजप प्रदेश समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली. ते भाजपच्या अनेक निवडणुकांचे प्रभारीही होते. दरम्यान, शिवमोग्गा तालुक्यातील मत्तुर या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, जेपी नड्डा, विरोधी पक्षनेते आर अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी भानुप्रकाश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. BJP leader MB Bhanuprakash died | पेट्रोल- डिझेलच्या दरात किती रुपयांनी वाढ? दरम्यान, कर्नाटक सरकारने सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ केली आहे. ‘कर्नाटक सेल्स टॅक्स’मधील बदलानंतर ही वाढ झाली आहे. कारण राज्य सरकारने विक्रीकरात 29.84% आणि 18.44% वाढ केली आहे. या वाढीनंतर बेंगळुरूमध्ये पेट्रोल 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 85.93 रुपये प्रति लिटर झाले आहे. यामुळे भाजपकडून कर्नाटकातील इंधन दरवाढीचा निषेध केला जात आहे. BJP leader MB Bhanuprakash died | हेही वाचा : ‘विठ्ठलाच्या नावाने दरोडा’ महाआरोग्य शिबीराचा खर्च लिहत आव्हाडांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप