Karnataka Accident : कर्नाटकातील (Karnataka Accident) यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघाताची दुर्घटना घडली. खासगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात (Karnataka Accident) घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. Karnataka Accident खासगी आरामदायी बस बंगळुरुहून कलबुर्गीला निघाली होती, तर कार विरुद्ध दिशेने येत होती. भरधाव कार खासगी आराम बसला येऊन धडकली असता कारने लगेच पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत कारमधील नऊ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तर, इतर प्रवाशांना आपला जीव वाचविण्यात यश मिळाले. या दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी (Karnataka Accident) झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. बस आणि कार यांच्यातील अपघात आणि आगीचे वृत्त कळताच अग्निशमक दल पाण्याच्या वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती. अपघातात होरपळून मृत्यूमुखी पडलेले नऊ जण एकाच कुटुंबातील असून ते देव दर्शनावरून परत येत होते.