Pimpri : मामासाहेब खांडगे शाळेत कारगिल विजय दिन उत्साहात

तळेगाव दाभाडे : कारगिल विजय दिनानिमित्त मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्य व बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि देशभक्तीच्या वातावरणात हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या प्रेरणादायी भाषणात सेवानिवृत्त अधिकारी बबन संभेराव यांनी कारगिल युद्धातील स्वतःच्या अनुभवांचे स्मरण करून दिले. त्यांनी आपल्या सेवेतील शौर्यगाथा सांगत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा भाव जागवला. कार्यक्रमात कारगिल युद्धाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित माहितीपूर्ण चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सैनिकांना समर्पित देशभक्तिपर गीतांद्वारे त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी बबन संभेराव आणि DYSF संस्थेचे संचालक रमेश रामराव वराडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिकाही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि प्रशासनाच्या सहकार्याने पार पडले.




