करीना शाहिदची गळाभेट अन् जब वी मेटची चर्चा; दिग्दर्शकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला….

Imtiaz Ali | नुकताच काही दिवसांपूर्वी आयफा अॅवार्ड पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला रेड कार्पेटवर बॅालीवूड इंडस्ट्रीतली कलाकारांनी हजेरी लावली होती. या अॅवार्ड शोमध्ये अनेक स्टार्संनी आपले परफॅार्न्मस सादर केले. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूरने एर्निजेटिक परफॅार्न्मस सादर केला.
या सोहळ्यात अभिनेत्री करीना खाननेही हजेरी लावली होती. यावेळी शाहिद आणि करीनाने एकमेकांना मिठी देत घेतलेली भेटची चर्चा सोशल मीडियावर चांगलची रंगली आहे. यामुळे जब वी मेट, १६ वर्षांपूर्वी शाहिद आणि करीनाची लव्हस्टोरी आणि ब्रेकअपच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दोघांच्या भेटीवर जब वी मेटचा दिग्दर्शक इम्तियाज अली याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जब वी मेट या सिनेमात करीना आणि शाहिद एकत्र दिसले होते. करीनाने साकारलेली गीत आणि शाहिदने वठवलेला आदित्य कश्यपची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आजही जब वी मेट सिनेमाविषयी लोकं भरभरून बोलत असतात. या सिनेमाच्या पुढचा भाग कधी येणार याविषयी प्रेक्षक नेहमी विचारताना दिसतात. मात्र, या सिनेमाच्या पुढच्या भाग सध्या तरी न येणार असल्याचे दिसत आहे.
दोघांच्या भेटीबाबत पीटीआयशी बोलताना इम्तियाजने, “शाहिद आणि करीना दोघेही आयफा पुरस्कार सोहळ्यात एकमेकांना भेटले हे फारच रंजक आहे. या भेटीनंतर लोक माझ्याशी ‘जब वी मेट’संदर्भात बोलत आहेत. शाहिदने यापूर्वीच सांगितलं आहे की तो या साऱ्यातून मुव्ह ऑन झाला आहे. मात्र माझ्या मते यामधून प्रत्येकजण मुव्ह ऑन झाला आहे. ‘जब वी मेट’ला आता फार कालावधी झाला आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
Jaipur, Rajasthan: Actor Shahid Kapoor & actress Kareena Kapoor Khan attends the IIFA Awards pic.twitter.com/DvTOwdh1aM
— IANS (@ians_india) March 8, 2025
भेटीचा व्हायरल व्हिडिओ अन् चर्चांना उधान
काही दिवसांपूर्वी आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात शाहिद आणि करीना एकमेकांना अगदी मिठी मारुन भेटले. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 2004 ते 2009 दरम्यान हे दोघे एकमेकांना डेट करत होते. याच कालावधीमध्ये 2007 साली ‘जब वी मेट’ प्रदर्शित झाला होता.





