Viral Video : बेबोचे ‘छम्मक छल्लो’वर ठुमके, प्रेक्षकांना केलं घायाळ

मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर अधिराज्य गाजवात असलेली अभिनेत्री करिना कपूर ही नेहमी वेगवेगळ्या अंदाजात दिसते. आपल्या वेगळ्या अंदाजाने चाहत्यांना भुरळ घालण्याचा ती नेहमी प्रयत्न करत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या डान्सचा एक व्हीडियो प्रचंड व्हायरल ( Viral video ) झाला आहे. त्यात ती लाल रंगाच्या घागरा परिधान करुन छम्मक छल्लो या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.
हा व्हायरल व्हीडियो तिच्या फॅन पेज वर शेअर करण्यात आला आहे. आतपर्यंत तब्बल 41 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हीडियोत करिनाने तिच्या आवडत्या रंगाचा म्हणजेच लाल रंगाचा पेहराव केला आहे. महत्वाचं म्हणजे या आधी करिनाला अनेक गाण्यांवर थिरकताना पाहिलं आहे. तिचे अनेक आयटम साँग प्रसिद्ध आहे. यातही तिने तोच अंदाज कायम ठेवत चाहत्यांची मनं जिंकली आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने तिचा चाळीसावा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर ती प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. त्यावर तैमुरचे अनेक व्हीडिओसुद्ध ती शेअर करते.
‘लाल सिंह चड्ढा’या चित्रपटातून ती प्रेक्षकापूढे येणार आहे. तिच्यासोबत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुद्धआ दिसणार आहे. थ्री इडियट्स या चित्रपटातून या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यावेळी तो चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी ते दोघे या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.





