करीना, दियाने ‘मदर्स डे’चे औचित्य साधत शेअर केली सुंदर पोस्ट

Kareena Kapoor| Dia Mirza Post : देशभरात ११ मे रोजी मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावर सेलिब्रेटींकडून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अभिनेत्री करीना कपूर आणि दिया मिर्जाने सोशल मीडियावर या दिवसाचे औचित्य साधत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून या अभिनेत्रींनी त्यांच्या आई होण्याची भावना व्यक्त केली आहे.
मदर्स डे निमित्त अभिनेत्री करीना कपूर आणि दिया मिर्झा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुंदर पोस्ट शेअर केल्या आहेत. करीना आणि दिया व्यतिरिक्त, अंकिता लोखंडे हिने देखील मदर्स डे निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या आईसोबत घालवलेले सुंदर क्षणांना व्हिडिओतून उजाळा दिला आहे. करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने आईची ताकद काय असते याबद्दल लिहिले आहे.
करीनाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, एक आई प्रत्येक दुःख सहन करते आणि ब्रेक न घेता आपल्या मुलाला वाढवते. ती हे करू शकते कारण तिचे तिच्या मुलावरचे प्रेम खरे आहे. तर दिया मिर्झानेही मदर्स डे निमित्ताने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मातृदिनाच्या शुभेच्छा तिने दिल्या आहेत. दियाने ही पोस्ट निसर्ग मदरशी कशी आणि त्यांच्याशी आपण कसे जोडले गेले आहोत याबद्दल लिहिले आहे. आपण निसर्ग मातेशी कसे जोडलेले राहिले पाहिजे याबद्दलही तिने सांगितले आहे.





