Kareena Kapoor : बॉलीवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’चा 8वा सीझन लोकप्रिय ठरत आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. आतापर्यंत या सीझनचे चार एपिसोड झाले असून चौथ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आलिया भट (Aliya Bhatt) यांची जोडी दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या एपिसोडमध्ये दोघीही अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसणार आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये करण जोहर करीनाला ‘गदर 2’ च्या सक्सेस पार्टीला उपस्थित न राहण्यामागचं कारण विचारतो आहे. या प्रश्नाद्वारे तो करीनाला अमीषासोबतच्या जुन्या भांडणावरुन छेडताना दिसतो. त्यावेळी करीना विचारते की, ‘अमिषा पटेलसोबतचा तिचा इतिहास काय आहे?’ तेव्हा करण जोहर सांगतो की ‘करीना ‘कहो ना प्यार है’ करणार होती, पण नंतर अमिषाने तो केला. त्यांच्यातील त्यावेळी जी दरी निर्माण झाली, ती अजूनही असल्याने करीना ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीला आली नाही का?’ हे ऐकून करीना आपला चेहरा दुसरीकडे वळवते आणि ‘मी करणला इग्नोर मारत आहे, जसे तुम्ही सर्व पाहू शकता,’ असे म्हणताना दिसते.
#AliaBhattKapoor & #KareenaKapoorKhan for the KwK next episode- promo is out!#KoffeeWithKaran #KoffeeWithKaranS8 pic.twitter.com/m1ZHmF7UEW
— Raymond. (@rayfilm) November 12, 2023
करीना आणि अमिषा यांच्यामधील नेमका वाद काय आहे?
अमिषा पटेलने ‘कहो ना प्यार है’ मधून डेब्यू केले होते. मात्र या चित्रपटात आमिषा आधी करिनाला या चित्रपटात साईन करण्यात आले होते. तिने काही सीन्सचं शूटिंगही केले होते. परंतु त्यानंतर काही कारणास्तव तिने हा चित्रपट सोडला. तेव्हापासून करीना आणि अमिषा पटेल यांच्यात वाद आहे.
‘कहो ना प्यार’ या चित्रपटात अमीषाची हृतिक रोशनसोबतची जोडी खूप आवडली होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसते. या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट झाली होती. या चित्रपटामुळे अमीषाला खरी ओळख मिळाली. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले.