‘खतरों के खिलाडी’च्या 14 व्या पर्वाचा करणवीर मेहरा ठरला विजेता

KKK 14 Winner | रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी 14’चा ग्रँड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. यात करणवीर मेहरा ‘खतरो के खिलाडी 14’चा विजेता झाला आहे. त्यानंतर करणवीर मेहरावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची विजेता बनण्याची संधी थोडक्यात हुकली.
करणवीर मेहरा हा टॉप ३ मध्ये स्थान मिळवणारा पहिला स्पर्धक होता. यानंतर कृष्णा श्रॉफने फिनाले गाठला आणि गश्मीर देखील फिनालेमध्ये पोहोचला. त्यानंतर या तिघांमध्ये फिनाले स्टंट खेळला गेला. करणवीरने गश्मीर आणि कृष्णा यांना हरवून शोची ट्रॉफी जिंकली.
बक्षिसाच्या स्वरुपात काय मिळाले?
करणवीरला ‘खतरो के खिलाडी 14’ची ट्रॉफी आणि २० लाख रुपये प्राईज मनी मिळाली. याशिवाय नवी कोरी आलिशान हुंडाई क्रेटा गाडी करणवीरला बक्षिसाच्या स्वरुपात मिळाली.
फिनाले एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना त्यांच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यांनी सर्व स्पर्धकांबरोबर खूप धमाल केली. दरम्यान, करणवीर मेहरा आता सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे.





