करण जोहरच्या डेटची चर्चा व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या डेटची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या चर्चांची सुरुवात सुप्रसिद्ध डिझायनर प्रबळ गुरुंगने शेअर केलेल्या फोटोमुळे झाली आहे. या फोटोवरुन करण जोहर प्रबळला डेट करत असल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. तसेच आता करण लग्न बंधनात अडकणार की काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकी- नेपाळी फॅशन डिझायनर प्रबळ गुरुंगने करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण आणि प्रबळ ऐकमेकांजवळ उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना प्रबळने “प्यार किया तो डरना क्‍या. करण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. फोटोचे कॅप्शन पाहता चाहत्यांमध्ये गोंधळच उडाला होता. परंतु नंतर त्याच्या या पोस्टवर खुद्द करण जोहरने रिप्लाय दिला आहे. त्याने “स्वत:वर आवर घाल, भावा’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, करण जोहर त्याचा आगामी “तख्त’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, करिना कपूर, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×