बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडया आहेत ज्यांना प्रत्येकजण पडद्यावर एकत्रित पाहू इच्छितात. या जोडीमध्ये सलमान खान आणि शाहरुख खानचा समावेश आहे. आजही चित्रपटप्रेमींना सलमान खान आणि शाहरुख खानला पडद्यावर एकत्रीपणे बघायला आवडतात. या दोघांनीही बऱ्याच वर्षांपासून एकत्रित चित्रपट केलेला नाही. आता एका चित्रपटात पुन्हा एकदा “करण-अर्जुन’ पाहावयास मिळणार आहेत. शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या पडद्यापासून दूर असून 2018मध्ये “झिरो’ या चित्रपटापासून त्याने कोणताही चित्रपट केलेला नाही. सध्या, शाहरुख खानने दोन प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. यापैकी एक म्हणजे शाहरुख खानने “पठाण’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खानदेखील झळकणार आहे. सलमान खान कॅमियो करताना दिसणार आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी मिळालेली नाही. या चित्रपटात शाहरुखसह जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहे. दरम्यान, यापूर्वी सलमान आणि शाहरुखने “करण-अर्जुन’ चित्रपटात काम केले होते. याशिवाय शाहरुखच्या “कुछ कुछ होता है’, “ओम शांति ओम’मध्ये सलमान खानने झलक दाखविली होती. दुसरीकडे सलमान खानच्या “हर दिल जो प्यार करेगा’ आणि “ट्यूबलाइट’मध्ये शाहरुखने झलक दाखविली होती.