Karale Guruji | ‘खदखद’ फेम कराळे गुरुजींनी शरद पवारांकडे मागितलं वर्धा मतदारसंघाचं ‘तिकीट’

Karale Guruji | ‘खदखद’ कराळे गुरुजी म्हणून संपूर्ण देशात ओळख मिळालेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालोअर्स असून यामुळे कराळे यांच्या व्हीडीओंची सर्वत्र चर्चा असते.
त्यांचे सोशल मीडियावर खात्यावर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना आपल्या अनोख्या शैलीत शिकवतांनाचे व्हिडिओ व्हायरल होतात. तसेच ते व्हिडीओच्या माध्यमांतून मोदी सरकारवर टीका करतांना दिसतात.
अशात विद्यार्थ्यांचे लाडके कराळे गुरुजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुणे येथे दाखल झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, आज शरद पवार विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला तिकीट देण्यात यावं, अशी कराळे गुरुजींची मागणी आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी ते आज पुण्यात आहेत. थोड्याच वेळात शरद पवार आणि कराळे गुरुजी यांची भेट होणार आहे.
माध्यमांशी बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले…
‘मी मागे काही भेटी घेतल्या, पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धा मध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे . प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडी मधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. असंविधनक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत, पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत. एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावी असं त्यांचं मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे, संध्याकाळ पर्यंत निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आत्ता सांगता येणार नाही.’
हे वाचाल का ? पप्पू यादव यांचा ‘इंडिया’आघाडीमध्ये प्रवेश ; लालू प्रसाद यादवांच्या भेटीनंतर जागाही ठरली ?





