कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे उपोषण

कराड : मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. नोटीस बजावण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना नाहीत. याबद्दल त्यांनी माफी मागावी, या मागणीसाठी नगराध्यक्षा शिंदे उद्यापासून उपोषण बसणार आहेत.

याबाबत नगराध्यक्षा शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, ठेकेदारांची बिले वेळेवर काढली जात नाहीत. नगराध्यक्षा सही करत नसल्याने ही बिले मिळत नाही. तातडीने या बिलांबवर सही करावी.

अन्यथा नगराध्यक्षांना अपात्र करण्याबाबतची नोटीसवजा पत्र पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मला दिले आहे. डांगे यांनी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन मला अपात्रतेची नोटीस दिली आहे.

ही नोटीस देत असताना यातील भाषाही चुकीची वापरली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी माफी मागावी. या मागणी करिता 16 मार्च पासून लोकशाही पद्धतीने मी उपोषण करत आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी माफी मागत नाहीत, तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.