नोयडा -ऋषभ पंत हा गुणी क्रिकटपटू आहे. आता तर त्याच्या कारकिर्दीची सुरुवात होत आहे. त्यामुळे त्याची महेंद्रसिंह धोनीशी तुलना होऊ शकत नाही, असे मत भारताचे विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी पुढे बोलताना कपील देव म्हणाले की, तुम्ही कुणाचीही तुलना धोनीशी करू नये. धोनीसारख्या खेळाडूची जागा घेणे कुणालाही शक्य नाही. धोनीशी तुलना करून पंतसारख्या नव्या खेळाडूवर दडपण आणणे अयोग्य ठरेल. पंत गुणी खेळाडू आहे आगामी काळात पंतसुद्धा स्वत:चे नाव कमावेल.
भारतीय वेगवान गोलंदाजांच्या खेळाच्या ताणाबाबत कपिल म्हणाला, खेळाचा ताण म्हणजे काय? मेहनत करणेच ना? मग तुम्ही मेहनतसुद्धा करणार नाही का? त्यामुळे त्यांनी आयपीएल मध्ये संपूर्ण सामने खेळने काही गैर नाही. तसेच आगामी विश्वचषका विषयी कपिल देव म्हणाले की, विश्वचषक जिंकणे सोपे नाही संघातील सर्वांना चांगली कामगिरी करावी लागेल असे त्यांनी नमूद केले.