Emergency Movie Banned in Bangladesh: अभिनेत्री कंगना रणौतची भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची तिचे चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. या चित्रपटाची रिलीज तारीख वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. अखेर हा चित्रपट आता 17 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे. मात्र, त्याआधीच या चित्रपटावर बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची कथा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात 1975 साली लावलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटात 1971 च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामातील भारतीय सैन्य, इंदिरा गांधी यांची भूमिका आणि शेख मुजीबूर रहमान यांना दिलेला पाठिंबा या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. शेख मुजीबूर रहमान हे बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती होते. पुढे त्यांची हत्याही करण्यात आली होती. या गोष्टींमुळे बांगलादेशात या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, याआधी देखील ‘इमर्जेन्सी’ चित्रपटावरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाची रिलीज तारीख देखील 4 वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर हा चित्रपट आता 17 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे.
या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शक कंगनाच आहे. कंगनासोबतच, चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तलपदे, मिलिंद सोमन या कलाकारांचीही मुख्य भूमिका आहे.