Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण ठरल्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अफवा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत कंगना रणौत लग्न करणार असल्याची ‘फेक न्यूज’ सोशल मीडियावर वेगाने पसरली होती. यावर आता कंगनाने स्वतः प्रतिक्रिया देत या अफवांचा जोरदार समाचार घेतला आहे. (Kangana Ranaut) नेमकं प्रकरण काय? एका मीम पेजने राहुल गांधी आणि कंगना रणौत यांचा फोटो शेअर करत, “राहुल गांधी भाजपमध्ये आले तर कंगना त्यांच्याशी लग्न करेल,” असा खोटा दावा केला होता. हे विधान कंगनाचे असल्याचा भास निर्माण करत ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यानंतर चर्चांना उधाण आले. (Kangana Ranaut) कंगनाची संतप्त प्रतिक्रिया कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हायरल पोस्ट शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही फेक न्यूज अत्यंत घृणास्पद आहे. राजकारणात महिलांचा सन्मान उरलेला नाही का?” असा सवाल करत तिने अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच, या प्रकाराला तिने ‘Misleading’ म्हणजेच भ्रामक असल्याचे स्पष्ट केले. (Kangana Ranaut) दरम्यान, कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून ती लवकरच ‘क्वीन २’ आणि ‘तनु वेड्स मनू ३’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती नेहमीच चर्चेत असते. (Kangana Ranaut) काही दिवसांपूर्वी तिचे नाव केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याशी जोडले गेले होते, मात्र ते फक्त मैत्री असल्याचे तिने स्पष्ट केले होते. या नव्या अफवांनंतर मात्र कंगनाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत अशा खोट्या बातम्यांना आळा घालण्याची गरज अधोरेखित केली आहे. (Kangana Ranaut)