Kangana Ranaut: कोलंबियातील राहुल गांधींच्या वक्तव्यावर कंगना रणौत भडकल्या; म्हणाल्या, विदेशात जाऊन भारताची प्रतिमा खराब करतात

Kangana Ranaut: कोलंबियामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून अभिनेत्री व भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना कंगनाने आरोप केला की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा खराब करत आहेत.
सध्या कंगना आपल्या मतदारसंघात आणि सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या ‘हर घर स्वदेशी’ अभियानाचा प्रचार करत आहेत. नुकतेच त्यांनी खादी ग्रामोद्योगला भेट दिली. त्या वेळी खादीची साडी नेसून त्यांनी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन दिले.
कंगनाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देतात आणि खादीचा प्रचार करतात. खादी वापरल्याने केवळ व्यक्तिमत्त्वात बदल दिसून येत नाही, तर गरीब कुटुंबांनाही आधार मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने खादीला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
Delhi: Reacting to to Lok Sabha LoP Rahul Gandhi’s statement, BJP MP Kangana Ranaut says, “He is a disgrace… If he says that the people of this country are quarrelsome and dishonest, that they don’t know what’s good for them, and that their minds don’t work when they vote and… pic.twitter.com/6bJpJpG8vQ
— IANS (@ians_india) October 2, 2025
दरम्यान, राहुल गांधींनी कोलंबियातील एका कार्यक्रमात भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच देशातील विविध धर्म, भाषा आणि संकल्पना यांमुळे तणाव वाढत असल्याचे ते म्हणाले होते.
यावर कंगनाने पलटवार करताना सांगितले की, राहुल गांधी सतत देशाची बदनामी करत आहेत. टीका करणे वेगळे असते, पण देशाला अस्थिर दाखवणे म्हणजे प्रतिमा मलिन करणे आहे. ते भारतातील लोकांना भांडखोर, बेईमान समजतात आणि त्यांच्या मतदानक्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे त्यांची ही भूमिका देशवासियांना कमी लेखणारी आहे, असे कंगना रणौत म्हणाल्या.





