Kangana Ranaut : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपणा सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. कंगना राणावत हिच्या नावाचा देखील यात समावेश आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कंगणाने रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इनस्टाग्रामला या फोटोसोबतच तिने खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. कंगना राणावत हिने लिहिले की, “मला नेहमीच वाटत होते की प्रभू राम लहान मुलासारखे दिसतील आणि माझी कल्पना या मूर्तीतून पुढे आली.” दुसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणाली, ‘किती सुंदर आणि मनाला भावणारी ही प्रतिमा आहे. देवाला दगडात धारण करणं… काय सांगू, ही देखील रामाचीच कृपा आहे. अरुण योगीराज, खरोखरच तुम्ही धन्य आहात. किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. अरुण योगीराजजी श्रीरामाने तुम्हाला स्वत: दर्शन दिले. तुम्ही धन्य आहात.” कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या राम लल्लाच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहासाठी निवड करण्यात आली आहे. कृष्णशीलावर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले. राम लालांच्या मूर्तीची पहिली झलक 18 जानेवारी रोजी समोर आली होती.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘तेजस’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण, OTT वर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘इमर्जन्सी’चा समावेश आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.