चिंबळी -कुरूळी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव चंदन पानसरे यांनी दिली. रमेश बागडे यांनी स्वखुशीने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती खेड येथे निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. कांबळे यांचा एकमेव अर्ज आला. सूचक म्हणून मावळते अध्यक्ष रमेश बागडे यांची स्वाक्षरी केली तर अनुमोदन माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोसावी यांनी दिले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष संजीवनी सोनवणे, संचालक काळूराम कड, अनिल बागडे, आशिष मुऱ्हे, गोरक्ष सोनवणे, सुरेश गायकवाड, सोपान सोनवणे, शांताराम घाडगे, दत्तात्रय सोनवणे आदी उपस्थित होते.