“मोदी सरकार फॅसिस्ट..” साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी केंद्र सरकारबाबत स्पष्टचं सांगितलं

Kamal hasan on modi sarkar : केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार अद्याप फॅसिस्ट झाले नाही, मात्र त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. त्याची स्क्रिप्ट अगोदरच लिहिण्यात आली असून ही कोणती नवी गोष्ट नसल्याचे मत प्रख्यात अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम अर्थात एमएनएम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी व्यक्त केले आहे.
चेन्नईत एका प्रतिष्ठित दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणाले की मोदी सरकारला फॅसिस्ट म्हणणे थोडे घाईचे ठरेल. ते अद्याप तसे झाले नाहीत, मात्र त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे. धोक्यांची घंटा वाजवली जाणे आवश्यक आहे. अजुनही ते स्वत:ला बदलू शकतात, मात्र मला त्यांच्यात बदलाचे कोणते संकेत दिसत नाहीत. आपण हा पॅटर्न पूर्वीही पाहिला आहे. ते नवे काही करत आहेत अशातला हा भाग नाही. | Kamal hasan on modi sarkar
लोकसभा निवडणुकीसाठी एमएनएमने तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाशी युती केली आहे. याबाबत बोलताना हासन म्हणाले की ही वेळ माझे राजकीय करिअर पुढे नेण्याचा विचार करण्याची नाही. माझ्या पक्षाची प्रगती आणि माझे करिअर पुढे नेण्यासाठी मी पुढे जाउ शकलो असतो. मात्र ही ती वेळ नाही. मी महात्मा गांधी यांचा प्रशंसक आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेस विसर्जित केली जाऊ शकते असे ते म्हणाले होते. कारण कॉंग्रेसचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले असे त्यांचे मानणे होते. मीही त्याच विचारांचा आहे. येणारी लोकसभा निवडणूक देशाचे भविष्यातील राजकारण ठरवणार असल्यामुळे अत्यंत महत्वाची आहे. | Kamal hasan on modi sarkar
ते पुढे म्हणाले की मी लोकसभेसाठी तीन चार जागा सहजपणे मागू शकत होतो. मात्र आता वेळ आघाडी मजबुत करण्याची आहे. भूतकाळात जरी द्रमुकवर आम्ही कठोर टीका केली असली तरी आता आपल्यासमोर एक मोठी लढाई आहे व ती देशासाठी लढायची आहे. | Kamal hasan on modi sarkar





