मुंबई – बॉलीवूडचे मैदान गाजवणारा ‘शोले’ हा चित्रपट आजही देशभरात लोकप्रिय आहे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि जया प्रदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी देखील याच चित्रपटाने बनवली होती. ‘शोले’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूड अभिनेते कमल हसन यांनी काम पाहिले होते. मात्र, या चित्रपटानंतर घडलेल्या एका अनोख्या घटनेबाबत कमल हसनने नवा खुलासा केला आहे.
कमल हसनने म्हणाले की, “जे शोले चित्रपटाचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी सांगतो की, मी या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक होतो. मी जेव्हा हा चित्रपट पाहिला त्या रात्री मला झोप येत नव्हती. पहिली गोष्ट, मी चित्रपटाचा खूप तिरस्कार करत होतो. पण त्यापेक्षा जास्त तिरस्कार मी रमेश सिप्पी यांच्यासारख्या महान चित्रपट निर्मात्याचा करत होतो.”
पुढे बोलताना कमल हसन म्हणाले की, ‘”मला त्या महान चित्रपट निर्मात्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी चित्रपट पाहिल्यावर ही माझी प्रतिक्रिया होती, असे मी रमेश सिप्पींना सांगितले. एक तंत्रज्ञ या नात्याने, मला त्या रात्री झोप लागली नाही आणि हा असाच चित्रपट आहे… असे अनेक चित्रपट अमितजींनी केले आहेत आणि त्यांना माझ्या चित्रपटांबद्दल छान गोष्टी सांगताना ऐकणे ही गोष्ट मी सहाय्यक दिग्दर्शक असताना आणि पाहत असताना कल्पनाही केली नव्हती. धन्यवाद, अमितजी.”
दरम्यान, कमल हसन यांचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’ असे ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्यात बदल करण्यात आला आहे. प्रभास, राणा, दीपिक पादुकोण, अभिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी यात चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.