Kalyan Murder Case : विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला…

कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोप विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्याने आज कोर्टात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर आरोपी विशाल गवळीला कोर्टातच रडू कोसळले.
पोलिसांना केली ‘ही’ विनंती
पोलिसांनी 2 जानेवरीला विशाल गवळी आणि साक्षी गवळीला पोलीस कोठीडीची आठ दिवसांची मुदत संपल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं होते. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी विशाल गवळीला कोर्टातच रडू कोसळलं. यानंतर त्याने मला एकदा पत्नीला भेटू द्या अशी विनंती त्याने पोलिसांना केली.
काय आहे नेमके प्रकरण?
विशाल गवळीने 23 डिसेंबरला एका ल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह 24 डिसेंबरला कल्याण जवळच्या बापगाव भागात आढळला होता. पोलिसांनी तपास केला असता कोळसेवाडीतून ती बेपत्ता झाल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी विशाल गवळीची पार्श्वभूमी पाहता त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेली विशालने मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं उघडं झालं.
पत्नीने केली मदत
विशालने अपहरण करुन मुलीला आपल्या घरी नेलं आणि अत्याचार करुन तिची हत्या केली. यानंतर मृतदेह मोठ्या बॅगेत लपवला होता. 7 वाजता बँकेत काम करणारी पत्नी घरी आली असता, विशालने तिला सगळा प्रकार सांगितला. यानंतर तिने पतीचा गुन्हा लपवण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं. दोघांनी विल्हेवाट कशी लावायची याची योजना आखली. घरातील रक्ताचे डाग पुसल्यानंतर त्यांनी मित्राची रिक्षा बोलावली. यानंतर रात्री 9 वाजता रिक्षाने मृतदेह घेऊन बापगावला गेले. तेथून परतत असताना विशालने आधारवाडी चौकात दारुची बाटली विकत घेतली आणि पत्नीच्या गावी शेगावला गेला.





