Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमींनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर ८ जणांचे मृतदेह सरकारी रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कसा झाला? नेमकं काय घडलं, याची माहिती पोलिसांकडून केले जात आहे. हेही वाचा: Asha Bhosle death: मुंबईपासून दुबईपर्यंत आशा ताईंचे साम्राज्य! आलिशान घरापासून ते रेस्टॉरंट साम्राज्यापर्यंत…जाणून घ्या संगीताच्या साम्राज्ञीची एकूण किती संपत्ती ?