Kalki Koechlin : ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री कल्की कोचलिनला (Kalki Koechlin )मोठी लोकप्रियता मिळाली. यातील तिची आदिती ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कल्की चित्रपटांमध्ये सक्रिय असली, तरी ती आपल्या कुटुंबासह गोव्यामध्ये वास्तव्यास आहे. मुंबईच्या झगमगत्या दुनियेतील धावपळीपासून दूर राहण्याचा तिने निर्णय घेतला आहे. कल्कीने नुकतेच एका पॉडकास्टदरम्यान तिच्या मानसिक आरोग्याबाबत सांगितले. जेव्हा तिचा घटस्फोट झाला तेव्हा तिला भरपूर मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या. तिला सलग अनेक महिने झोपच लागत नव्हती. (Kalki Koechlin) कल्कीने म्हटले की, “त्या घटनेनंतर मी कित्येक महिने निद्रानाश सारख्या समस्येने त्रस्त होते. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या किती मानसिक परिणाम होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलं.या काळात मला झोप लागत नव्हती आणि रात्री २-३ वाजता जाग येत असे. त्यानंतर पुन्हा झोप येत नसल्याने मी गिटार वाजवत बसायचे किंवा स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवत असे.” (Kalki Koechlin) दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये देव.डी या चित्रपटाद्वारे केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले होते. तिचे नाव दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत जोडले गेले होते. देव डी या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. याच चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याचदरम्यान तिची अनुराग कश्यपशी ओळख झाली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी विवाह केला. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर २०१३ मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. (Kalki Koechlin) अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर, कल्की इस्रायलचा रहिवासी असलेल्या गाय हर्षबर्गला डेट करत होती. या दोघांनी बऱ्याच काळापर्यंत एकमेकांना डेट केले. या नात्यातून या अभिनेत्रीला ‘सॅफो’ नावाची एक मुलगी आहे. कल्की कोचलीनने मुलीच्या जन्मानंतर चार वर्षांनी 2024 मध्ये आपल्या बॉयफ्रेंडशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याने आपल्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला. कल्की नेहमीच आपले आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्यावर विश्वास ठेवते. Kalki Koechlin हेही वाचा: Yusuf Pathan: माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यासह मेहुण्याला अटक; किरकोळ कारणावरुन मोठा राडा