Kalki Koechlin: ‘मातृत्व स्त्रीला सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतं’… कल्की कोचलिन

Kalki Koechlin: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा केली जाते. या निमित्ताने अभिनेत्री कल्की कोचलिन हिने मातृत्व, नारीशक्ती आणि सणांविषयी अनुभव शेअर केले.
कल्की म्हणाली की, तिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण तो होता जेव्हा तिची मुलगी शेजाऱ्यांसोबत डांडिया-गरबा खेळताना दिसली. “अशा सणांमुळे समाज एकत्र येतो, संवाद वाढतो आणि संस्कृतीत सहभागी होण्याची संधी मिळते,” असे ती म्हणाली.
बालपणाच्या आठवणी सांगताना तिने म्हटले की, दुर्गामातेचे दहा हात पाहून ती नेहमी विचार करायची, “मलाही दहा हात असायला हवे होते.” नवीन कपडे घालण्याची आणि नवरात्रीच्या कथा ऐकण्याची आठवणही तिने सांगितली.
कल्कीने मातृत्वाबद्दल बोलताना सांगितले की, आई झाल्यावर जीवनाची दिनचर्या पूर्णपणे बदलते. “मातृत्वाने मला जाणवले की माझे शरीर किती मजबूत आहे. गर्भधारणा आणि पोषण हीच खरी नारीशक्ती आहे,” असे ती म्हणाली.
मुलीला ती ‘नाही’ म्हणायला शिकवत आहे. तसेच महिलांना संदेश देताना कल्की म्हणाली की, “स्वतःला प्राधान्य द्या, मदत मागायला संकोच करू नका, स्वतःवर दया ठेवा आणि जास्त अपेक्षा ठेवू नका. हाच खरी नवरात्रीचा संदेश आहे.”
तिने सांगितले की तिच्या आईमध्ये आणि तिच्यात जिद्द व फोकस हा समान गुण आहे आणि तोच गुण ती आपल्या मुलीतही पाहते. शेवटी कल्की म्हणाली,“ही दुनिया महिलांशिवाय चालूच शकत नाही. नारीशक्ती हीच जीवनाची खरी ताकद आहे.”





