Kalki 2898 AD Sequel: प्रभास अभिनीत मेगाबजेट चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. नाग अश्विन दिग्दर्शित या सायन्स-फिक्शन आणि पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि कमल हासन यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. जून 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतासह जगभरात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत (सीक्वल) चर्चा वेगाने सुरू झाल्या असून, त्यातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे दीपिका पादुकोण या सीक्वलमध्ये दिसणार की नाही? दीपिकाच्या जागी साई पल्लवी? मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘कल्कि 2898 एडी 2’ मध्ये दीपिका पादुकोणच्या जागी अभिनेत्री साई पल्लवी हिचं नाव विचाराधीन आहे. रिपोर्टनूसार, चित्रपटाशी संबंधित एका प्रतिनिधीने सांगितले आहे की दीपिकाच्या एक्झिटनंतर SUM-80 म्हणजेच सुमतीच्या भूमिकेसाठी साई पल्लवी एक मजबूत पर्याय मानली जात आहे. मात्र, निर्मात्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, “सध्या काहीही फाइनल झालेलं नाही. पण दीपिका चित्रपटातून बाहेर गेल्यानंतर साई पल्लवी या भूमिकेसाठी योग्य वाटत आहेत. कास्टिंग लॉक झाल्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल.” Sai Pallavi पहिल्या भागात सुमती कोण होती? ‘कल्कि 2898 एडी’च्या पहिल्या भागात दीपिका पादुकोणने सुमती (SUM-80) ही भूमिका साकारली होती. ती यास्किन लॅबमधील एक प्रयोगाची सब्जेक्ट होती आणि कथेत ती गर्भवती दाखवण्यात आली होती. नंतर अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या अश्वत्थामा यांच्या मदतीने ती कमल हासनच्या सुप्रीम यास्किन या खलनायकाच्या लॅबमधून पळून जाते. तेलुगू व्हर्जनमध्ये दीपिकाच्या पात्राला शोभिता धुलिपालाने डबिंग केलं होतं. बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश ‘कल्कि 2898 एडी’ने जगभरात सुमारे 1042 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात प्रभास – भैरव अमिताभ बच्चन – अश्वत्थामा कमल हासन – सुप्रीम यास्किन अशा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले. चित्रपटाची कथा, भव्य व्हिज्युअल्स आणि पौराणिक पार्श्वभूमीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता सगळ्यांचं लक्ष ‘कल्कि 2’ कडे लागलं असून, खरंच साई पल्लवी सुमतीच्या भूमिकेत दिसणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.