K.C.Venugopal : संसदेच्या लोकलेखा समितीची धुरा कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल (K.C.Venugopal) यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्या समितीच्या अध्यक्षपदी वेणुगोपाल यांची फेरनियुक्ती केली. लोकलेखा समितीची रचना वर्षभराच्या कालावधीसाठी करण्यात आली. समितीच्या (K.C.Venugopal) सदस्यांमध्ये राज्यसभा, लोकसभेतील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील खासदारांचा समावेश आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून स्थान मिळालेल्या राज्यसभेच्या खासदारांमध्ये भाजपचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचीही नावे आहेत. K.C.Venugopal अंदाज समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. तर, भाजपचेच नेते फग्गनसिंह कुलस्ते यांच्याकडे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) कल्याणविषयक समितीची सुत्रे सोपवण्यात आली. भाजपचे (K.C.Venugopal) आणखी एक नेते बिजयंत पांडा सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्या समित्यांनाही वर्षभराचा कार्यकाळ लाभेल. तसेच, त्याही समित्यांच्या सदस्यांमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश आहे. ते सत्ताधारी आणि विरोधी गोटांतील विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यामुळे महत्वाच्या संसदीय समित्यांमध्ये बहुपक्षीय खासदारांना स्थान मिळाल्याचे दिसते.