Jyoti Waghmare Oath Taking Ceremony : ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे रामराव वडकुते आणि माया ईवनाते तर शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील ५, तामिळनाडूतील ६, पश्चिम बंगालमधील ५आणि ओडिशामधील ३ सदस्यांचा समावेश आहे. अशा विविध राज्यातील एकूण १९ जणांनी खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. शरद पवार यांनी घेतली व्हीलचेअरवरुन शपथ Jyoti Waghmare Oath Taking Ceremony या सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन शपथ घेतली. तर ज्योती वाघमारे सावित्रीबाईंच्या वेशात खासदारकीची शपथ घेण्यासाठी हजर राहिल्या होत्या. ज्योती वाघमारेंची सावित्रीबाई फुले यांच्या वेशात खासदारकीची शपथ या शपथविधीत ज्योती वाघमारे यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत सावित्रीबाई फुले यांचा वेशात खासदारकीची शपथ घेतली. डोक्यावर पदर, हातात संविधान आणि कपाळावर आडवी चिरी लावत वाघमारेंनी शपथ घेतली. Jyoti Waghmare Oath Taking Ceremony एकनाथ शिंदे यांच्याही नावाचा उल्लेख ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे यांनी राज्यसभेची शपथ घेताना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर या महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्याही नावाचा उल्लेख केला. Jyoti Waghmare Oath Taking Ceremony मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती व उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले. कोणत्याही व्यक्तीच्या नावाशिवाय फक्त संविधानाची साक्ष घेत ज्योती वाघमारे यांनी खासदारकीची शपथ घेतली. Jyoti Waghmare Oath Taking Ceremony हेही वाचा: PM Modi vs TMC: ‘मातृभाषेचा अपमान’ विरुद्ध ‘तुष्टीकरणाचा कट’ : बंगालमध्ये पंतप्रधानांच्या वक्तव्याला TMC कडून प्रत्युत्तर