पिंपरी | ज्योती काळे ठरल्या पैठणीच्या मानकरी

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – श्री स्वामी समर्थ केंद्र तळेगाव स्टेशन, महिला पतंजली समिती मावळ, जीवन ज्योत सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. होम मिनिस्टरच्या स्पर्धेमध्ये ज्योती काळे या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताबाई मोहनराव काकडे होत्या. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सारिकाताई काकडे व मंगलताई काकडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालिनी झगडे, श्वेता शहा, शैलजा काळोखे, रजनीगंधा खांडगे, हेमलता दाभाडे, वृषाली काकडे, शितल शहा, सावित्री भेगडे, वृषाली कदम, ममता कोतुळकर आदी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. प्रमोद बडीगर ,वैशाली निगडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
होम मिनिस्टर स्पर्धेत विजयी महिला – ज्योती काळे (प्रथम) पैठणी, कोमल शेळके (द्वितीय) सोन्याची नथ, सविता असवले (तृतीय) चांदीचा छल्ला पटकविला आहे. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शिल्पा कुडेकर, रंजना साळुंखे, भोजताई, कौसल्या बनसोडे, श्रद्धा तांबडे, माया येवले, हेमलता जयगुडे, सुजाता नलवडे, सुनिता सातपुते आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्वेता मोहिते यांनी केले. तर आभार सुविधा बलशेट्टी यांनी मानले.





