न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
Updated On:

दिल्ली : राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी ही घोषणा केली. ही नियुक्ती 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू होईल असे त्यांनी म्हटले आहे.
न्यायमूर्ती खन्ना यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ असेल, ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. त्यांची आज नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 11 नोव्हेंबरला ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.





