जुन्नर – तालुक्यात नव्याने 69 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 17 हजार 111 झाली आहे. तर 16 हजार 005 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 587 रुग्णांचा मृत्यू झाला.
तर 519 जणांवर उपचार सुरू आहेत. खोडद गावात 10, ओतूर व शिरोली बुद्रुकमध्ये प्रत्येकी 8, पिंपळवंडी 4, रानमळा, नारायणगाव, खामुंडी, गुंजाळवाडी आर्वी, जुन्नर येथे प्रत्येकी 3, वारुळवाडी, धोलवड, उदापूर, बोरी बद्रुकमध्ये प्रत्येकी 2,
तर वडगाव आनंद, गायमुखवाडी, बेल्हे, यादववाडी, तांबेवाडी, मंगरुळ, निमगाव सावा, येडगाव, मांजरवाडी, धालेवाडी, आर्वी, डिंगोर, उंब्रज नं. 1 व जाधववाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.