Pune District : जुन्नर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर; हक्काचा गण आरक्षित

जुन्नर : जुन्नर पंचायत समितीच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर झाले असून हक्काचा गण आरक्षित झाल्याने अनेक ठिकाणी “कही ख़ुशी कही गम” चे वातावरण आहे.
काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंचायत समितीच्या सदस्य पदाची आरक्षण सोडत सोमवारी ( दि. १३) जुन्नर पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृह येथे पार पडली. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे,पल्लवी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके, निवडणूक नायब तहसीलदार अनंथा गवारी, त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
जुन्नर पंचायत समितीच्या गणांच्या संख्येत २ ने वाढ होऊन एकूण सदस्य संख्या १६ झाली आहे. आरक्षण सोडत पार पडल्यानंतर इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले असून अनेक इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३६६ पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सोमवारी (दि. १३) आरक्षण सोडत झाली. याबाबत प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाच्या राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.
जुन्नर तालुका पंचायत समिती गण
• उदापूर- सर्वसाधारण महिला
• डिंगोरे – सर्वसाधारण महिला
• ओतूर – सर्वसाधारण
• धालेवाडी तर्फे हवेली – सर्वसाधारण महिला
• पिंपळवंडी – सर्वसाधारण
• आळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
• राजुरी – सर्वसाधारण
• बेल्हे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
• बोरी – सर्वसाधारण
• खोडद – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
• नारायणगाव – अनुसूचित जाती महिला
• वारुळवाडी – सर्वसाधारण महिला
• सावरगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
• कुसूर – सर्वसाधारण
• बारव – अनुसूचित जमाती महिला
• तांबे – अनुसूचित जमाती महिला





