Junnar News : जुन्नर कारखाना रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा
Updated On:

जुन्नर: जुन्नर कारखाना रस्त्याचे रखडलेले आणि निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्यासाठी जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून, मंजूर काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शेतकरी संघटनेने मागणी केली आहे की, रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे. निवेदनाची दखल न घेतल्यास संघटना आक्रमक पवित्रा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून बेमुदत आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.





