जुनैद खान आणि खुशी कपूरच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Junaid khan And Khushi kapoor | बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर एका रोमँटिक ड्रामा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. जुनैद खानने अलीकडेच ‘महाराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देखील सर्वांकडून कौतुक करण्यात आले होते. यानंतर आता दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून ‘लव्हयापा’ असं चित्रपटाचं नाव आहे. जुनैद-खुशी यांच्या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. नवीन पोस्टरसोबत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. Junaid khan And Khushi kapoor |
View this post on Instagram
मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. फँटम स्टुडिओद्वारे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “सिच्युएशनशिप की रिलेशनशिप? लव्ह का सियाप्पा की लव्हयापा? येत्या ७ फेब्रुवारीला २०२५ हा चित्रपट थिएटमध्ये पाहा,” असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हा चित्रपट २०२२ साली आलेल्या तमिळ ‘हिट लव्ह टुडे’ चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जातं आहे. ज्याचे दिग्दर्शन प्रदीप रंगनाथन यांनी केले होते. ‘लव्हयापा’ हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. जुनैद आणि खुशीला या चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी सिनेरसिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. Junaid khan And Khushi kapoor |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जुनेद खान याआधी ‘महाराज’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शालिनी पांडे आणि जयदीप अहलावत देखील दिसले होते. या चित्रपटात धर्माच्या नावाखाली होणाऱ्या दुष्कृत्यांची कथा दाखवण्यात आली आहे. तर खुशी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये दिसली होती. या सिनेमात तिच्याच्यासोबत सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि इतर कलाकार दिसले होते.
हेही वाचा:
मोठी बातमी: दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; 28 जणांचा मृत्यू





