‘क.क.क.किरण’ डायलॉग कसा सुचला? जुहीने सांगितला किस्सा

अभिनेत्री जुही चावला आणि अभिनेता शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. लोकांना त्यांची जोडी खूप आवडायची. एकत्र काम केल्यामुळे दोघांनाही एकमेकांबद्दल खूप चांगली माहिती आहे. याचे ताजे उदाहरण नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात पाहायला मिळाले, ज्यामध्ये जुहीने ‘डर’ चित्रपटाशी संबंधित शाहरुख खानचा एक किस्सा शेअर केला.
जुही चावला आणि शाहरुख खानने डर या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात शाहरुख नकारात्मक भूमिकेत दिसला होता. चित्रपटातील ‘क.क.क.किरण’ म्हणण्याची त्याची शैली चांगलीच प्रसिद्ध झाली. इतकं की शाहरुख खानची नक्कल करणाऱ्या लोकांनी नक्कीच त्याची कॉपी केली. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इव्हेंटमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान, जुही चावलाने शाहरुख खानच्या संवाद बोलण्याच्या पद्धतीबद्दल खुलासा केला. जुहीने शाहरुखने ‘आय लव्ह यू k..k..k…किरण’ हा डायलॉग आला याबाबत सांगितले.
जुही चावला म्हणाली की, ‘चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा थोडं अडखळत बोलतात. जुहीने याकडे लक्ष दिले नव्हते, पण शाहरुखने या गोष्टीला हाताशी धरून किरण हे नाव अडखळत बोलायचे ठरवले होते. असा क… क… क… किरण हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला. जेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटातील शाहरुखचा डायलॉग ऐकला तेव्हा ते प्रत्येकाच्या तोंडावर हा डायलॉग असायचा.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘डर’ चित्रपटाने शाहरुख खानला अँटी-हिरो म्हणून नवीन ओळखत दिली. या चित्रपटात सनी देओलनेही काम केले होते. हा चित्रपट 24 डिसेंबर 1993 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘जादू तेरी नजर’, ‘लिखा है ये’, ‘तू मेरे सामने’ आणि ‘आंग से अंग लगाना’ ही गाणी प्रचंड हिट झाली.





