मुंबई – नव्वदच्या दशकापासून बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली जुही चावला 55 वर्षांची झाली आहे. तिचे सौंदर्य आणि स्माईल आजही चाहत्यांची मने जिंकत.सध्या कुटुंबाला वेळ देत असल्यामुळे जुही मोठ्या पडद्यापासून काहीशी दूर असल्याचे दिसून येते. नुकतंच जुहीने आपल्या मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत जे कि तिच्या मुलीच्या ग्रॅज्युएशनचे असल्याचे समजते.
जुहीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. ज्यावर अनेक सेलिब्रेटी देखील तिच्या मुलीचं कौतुक करताना दिसत आहेत. जुहीची मुलगी कोलंबियामध्ये शिकत होती. मुलीनं ग्रज्युएशन पूर्ण केल्यांनतर आई जुहीनं तिच्या पदवी सोहळ्यातील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मुलीचं अभिनंदन केलं आहे.
जुहीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये जुहीचा मुलगा अर्जुन मेहता आणि पती जय मेहता देखील दिसत आहेत. तर आणखी एका फोटोमध्ये जान्हवी हातात पुष्पगुछ घेऊन उभी असलेली पाहायला मिळत आहे. ‘अभिमानास्पद आणि आनंददायी’ अशा कॅप्शनखाली जुहीने हे फोटो पब्लिश केले आहेत.
जुही चावलाने कयामत से कयामत तक, हम है राही प्यार के, इश्क,येस बॉस आणि डर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1995 मध्ये, अभिनेत्रीने उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केले, तिला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत. अभिनयासोबत ती उद्योग क्षेत्रात देखील कार्यरत आहे.
View this post on Instagram
चाहत्यांना जुहीच्या लेकीचा हा साधा अंदाज चांगलाच भावला आहे. जुहीच्या या प्सोट्वर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ‘डिक्टो जुही’ अशी कमेंट एका जहत्याने केली आहे. तर आणखी एकाने ‘आता बॉलिवूडमध्ये कधी दिसणार ? असा सवाल विचारला आहे.