Chandrababu Naidu – कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या याचिकेवरील निकाल मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी देण्यात येणार आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी कौशल्य विकास महामंडळातील एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. बेला एम त्रिवेदी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी नायडू यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.
2015मध्ये मुख्यमंत्री असताना कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी नायडू यांना गतवर्षी 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला होता.