महाळुंगे इंगळे येथील जोपाई वाडी जिल्हा परिषद शाळेला मिळेना शिक्षक

खेड : श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे तालुका खेड येथील जोपाई वाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण या ठिकाणी परिसरातील मुलं घेत आहेत प्रामुख्याने आदिवासी वस्तीत ही शाळा असल्यामुळे येथे आदिवासी मुलांची संख्या जास्त आहे 46 मुलं आणि 38 मुली अशी एकूण 84 पटसंख्या शाळेची असून देखील या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक उपलब्ध आहेत.
त्यातील एका शिक्षकाला मतदार याद्या तयार करण्याचे काम तसेच इतर प्रशासकीय कामे करावी लागतात त्यामुळे त्यांना सतत सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.शाळा आहे मुलं आहेत परंतु शिक्षक नाहीत अशी दुर्दैवी अवस्था या शाळेत निर्माण झाली आहे.
शिक्षण विभागाकडे अनेकदा मागणी करून देखील या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षणावर विपरीत परिणाम होऊन मुलांचे भविष्य धोक्यात असल्याची खंत महाळुंगे इंगळे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली.झोपाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निसर्गाच्या अत्यंत चांगल्या वातावरणात असून शाळेच्या खोल्या देखील चांगल्या आहेत.
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः आदिवासी वस्त्यांमधील मुलं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु अद्यावत अशी शिक्षण सामग्री उपलब्ध नसल्याने आणि शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यावरती परिणाम होत आहे. “शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत महाळुंगे इंगळे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले यांच्या सहकार्यातून शाळेला एक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला.





