दुसऱ्या सामन्यात दमदार शतकी खेळी केल्यानंतर जॉनी बेयस्ट्रो म्हणाला…

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना काल (मंगळवारी) पार पडला. या सामन्यात इंग्लडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लडने १-१ ने बरोबरी साधली. इंग्लडच्या विजयात जॉनी बेयस्ट्रो आणि बेन स्टोक्स यांची शानदार खेळी महत्वपूर्ण ठरली.
हा सामना संपल्यानंतर जॉनी बेयस्ट्रोने आपल्या दमदार खेळीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जॉनी बेयस्ट्रोच्या मते त्याने पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजी चागली होती. परंतु आपले शतक पूर्ण करु शकला नव्हता.मात्र यावेळी त्यांनी कोणतेही चूक न करता आपले शतक साजरे केले.
जॉनी बेयस्ट्रोने जेसन रॉय सोबत सलामीला फलंदाजी करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाचा प्रमख गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कौतुक केले. दुसरा सामना पार पडल्यानंतर जॉनी बेयस्ट्रो म्हणाला, “मागील सामन्यात शतक पुर्ण न करु शकल्याने मी निराश होतो. परंतु या वेळेस मी आनंदी आहे की, तिथपर्यंत पोहचू शकलो.
आम्ही मागील सामन्याप्रमाणे विचार करत होतो आणि गेम प्लॅन तोच होता. बेन स्टोक्सने जबरदस्त शॉट लगावले आणि जेसन रॉयने सुद्धा शानदार फलंदाजी केली. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खासकरुन भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी केली. माझ्या आणि जेसन रॉयमध्ये खुपच चांगला ताळमेळ आहे आणि आशा आहे की, आम्ही पुढे सुद्धा अशीच भागीदारी करत राहू. डीप कवरच्या वरुन जो मी शॉट खेळला होता, त्याचा सर्वात जास्त आनंद घेतला.”
जॉनी बेयस्ट्रोने ठोकले दमदार शतक
दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली होती, तरी देखील भारतीय संघाचा ६ विकेट्सने पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३३६ धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात इंग्लडने आक्रमक फलंदाजी करताना हे लक्ष्य फक्त ४४ षटकांत ४ विकेट्स गमावून पुर्ण केले.
जॉनी बेयस्ट्रोने या सामन्यात दमदार फलंदाजी करतांना शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ११२ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकार लगावत आक्रमक १२४ धावांची खेळी केली. त्याच्या सोबत बेन स्टोक्सने दमदार खेळी केली. मात्र त्याचे केवळ एका धावेने शतक हुकले. त्याने ५२ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकार लगावत ९९ धावा केल्या.





